महाराष्ट्र राज्यातील महिलांना आधार देणारी राज्य शासनाची ladakibahin.maharashtra.gov.in मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना..! या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपायची मदत, अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन हे २.५० लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांना मिळणार योजनेचा लाभ. लाभार्थी महिलेला DBT (Direct Benefit Transfer) द्वारे हा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहिण योजना काय आहे? What is Ladaki Bahin Yojana Maharashtra?

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी ladkibahin maharashtra gov in मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थिती मध्ये सुधारणा तसेच पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरु केली आहे. राज्य शासनाने महिलांसाठी महत्वपूर्ण योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिला उत्सुक आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासन निर्णय​

सदर योजनेचा शासन निर्णय २८ जून २०२४ रोजी काढण्यात होता, आता काहीं दिवसापूर्वी योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आले असून त्यातील महत्वपूर्ण बदल म्हणजे २८ जून २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ दिला जाणार होता परंतु आता यामध्ये बदल करून २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या कुटुंबातील १ महिला व कुटुंबातील वय वर्षे २१ पुढील मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ladakibahin maharashtra.gov.in या वेबसाईट वरून लाभार्थी अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना वेबसाईट बद्दल सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी १ ऑगस्ट २०२४ पासून शासनाने ladakibahin.maharashtra.gov.in हि वेबसाईट सुरु केली आहे. अर्ज करण्यासाठी अनेक अर्जदारांना हि वेबसाईट माहिती नसून ते ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अर्ज करण्यासाठी “ladkibahin.maharashtra.gov.in” हि वेबसाईट नसून “ladakibahin.maharashtra.gov.in” हि वेबसाईट आहे. सर्व अर्जदारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरतीच आपला अर्ज भरावा. अर्ज भरताना सर्व माहिती हि अचूक भरावी तसेच संबधित कागदपत्रे अपलोड करावी. आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर तुन्हाला मोबाईल एसएमएस द्वारे कळविले जाईल.

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स (आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक)
  • मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला (केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही)
  • अधिवास प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक)
  • १ पासपोर्ट आकाराचा फोटो

ladakibahin maharashtra.gov.in registraion Process

लाडकी बहिण योजना रजिस्ट्रेशन

अर्ज भरण्यापूर्वी सर्वप्रथम पोर्टलवरती नवीन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर लाभार्थीचा मोबाईल नंबर हा वापरकर्ता नाव असणार आहे.

लाडकी बहिण योजना लॉगइन

पोर्टलवरती लॉग इन करण्यापूर्वी पोर्टल वरती नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच पोर्टल वरती लॉगइन करता येते. या साठी सर्वप्रथम नवीन नोंदणी करावी त्यानंतर आपला मोबाईल व पासवर्ड टाकून लॉगइन करावे.

लाडकी बहिण योजना अर्ज करा

Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे, त्यानंतर आपल्या समोर आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकुन घ्यावा.

Scheme Name Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
लाभार्थी
महिला
वर्ष
2024
उद्दिष्ट
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व स्वावलंबी बनविने
मिळणार लाभ
दर महिना 1500 रुपये
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन तसेच ऑफलाईन
अर्ज सुरु दिनांक
1 जुलै 2024
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
१५ ऑक्टोंबर २०२४
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट
लाडकी बहिण योजना अँप
Narishakti Doot App
राज्य
महाराष्ट्र
शासन निर्णय
शासन निर्णय पहा
हेल्पलाईन नंबर
181

ladki bahin maharashtra gov in registration online

  1. सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल मोबाईल मध्ये ओपन करा.
  2. पोर्टल वरती विविध योजेनेबद्द्ल माहिती दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला पोर्टल वरती नोंदणी करणे गरजेचे आहे, यामुळे आपण सर्वप्रथम पोर्टल वरती आपली नोंदणी करून घ्यावी.
  3. नोंदणी केल्यानंतर आपले वापरकर्ता नाव व पासवर्ड वापरून पोर्टल वरती लॉग इन करा.
  4. आपण यशस्वीरित्या पोर्टल वरती लॉग इन झाल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana हा  पर्याय पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करावे.
  5. त्यानंतर लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर Send OTP बटन वरती क्लिक करावे.
  6. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो टाकून व्हेरीफाय करून घ्यावा.
  7. त्यानंतर नोदणी अर्ज आपल्या समोर ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराचे नाव व इतर माहिती अचूक भरावी.
  8. आपण महाराष्ट्रातील आहे का? या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्या समोर पुढील फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आपण व्यवस्थित भरायचा आहे.
  9. बँकेची माहिती यामध्ये बँकेचे नाव, बँक खातेदाराचे नाव, खाते क्रमांक व बँक शाखेचा आयएफएससी कोड हा अचूक भरावा.
  10. त्यानंतर लाभार्थी व्यक्तीचे कागदपत्रे हे पोर्टल वरती अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर फॉर्म Submit करावा.
  11. अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या प्रोफाईल मध्ये आपल्याला अर्ज पाहायला मिळेल.
  12. अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्यास याबद्दल एसएमएस द्वारे अर्जदाराला कळविले जाते.

Ladki Bahin Yojana Last Date in Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी राज्यात १ जुलै २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अर्जदार महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती परंतु हि मुदत वाढवून ३१ ऑगस्ट २०२४ करण्यात आली होती. ३१ ऑगस्ट २०२४ नंतर सुद्धा लाभार्थींना ऑनलाईन अर्ज भरता येत होते. पुन्हा हि मुदत वाढवून १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. आता लाभार्थींना १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. यामुळे ज्या लाभार्थींनी अजून योजनेसाठी अर्ज केला नसेल त्या अर्जदारांना अर्ज करण्यासाठी वाढीव कालावधी मिळाला आहे. अर्जदारांनी विहित कालावधी मध्ये आपला अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज भरावा.

Scroll to Top